मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विदूषक : जी.ए.कुलकर्णी ( कथा )

( मराठीतील काही निवडक कथा क्रमांक:- १ )  १.  विदूषक (कथा) :   जी.ए.कुलकर्णी  (काजळमाया कथासंग्रहातून) विशाल पसरलेल्या द्वादश गोपुरांनी सुशोभित असलेल्या रक्ताक्षीच्या मंदिरावर सुवर्णरंगाचा हंसध्वज मंदपणे थरथरत होता आणि शुभ्र कंदामधून केशरपुष्प उमलल्याप्रमाणे भासत होता. महामंदिराच्या दीर्घ, चित्रवेलीयुक्त अशा पाय-या ओलांडल्यावर खाली अत्यंत विस्तीर्ण असा संगमरवरी मंडप होता आणि त्या ठिकाणी आज राजसभेची योजना झाली होती. अर्धवर्तुळाकार मांडलेल्या अलंकृत आसनावर सर्व अमात्य तर राजवस्त्रात स्थानापन्न झाले होतेच, पण त्याशिवाय आजच्या विशेष प्रसंगी, पर्वतांच्या उतरणीवर राहणा-या वनजनांचे व्याधप्रमूख, सागराशी झुंज देत जगणा-या धीवरांचे नायक, झंजावाताप्रमाणे वनमुक्त संचारणा-या अश्वसमूहांना रजुबद्ध करणा-या अश्वव्यापा-यांचे नेते इत्यादी अनेक मांडलिकही उपस्थित होते. व्याधप्रमुखांच्या अंगावर कृष्णजीनांची आवरणे होती व त्यांनी कानात रुद्र-सुवर्णवलये अडकवली होती. धीवरांच्या अंगावर झगझगीत रेशमी वस्त्रे तंग बांधलेली दिसत होती आणि गुडघ्याखाली त्यांचे पाय उघडे, ओबडधोबड व केसाळ होते....

आपल्या "आत" आपण प्रेशर कुकर जन्माला घालतोय? - धनंजय देशपांडे

आपल्या "आत" आपण प्रेशर कुकर जन्माला घालतोय?       - धनंजय देशपांडे ( आपल्या "आत" आपण प्रेशर कुकर जन्माला घालतोय?कोरोनापेक्षा ही वेगाने वाढणारा मानसिक तणाव रोग... अपेक्षाचं ओझं तुमच्या आयुष्यात प्रेशर कुकरचं काम करतायेत का? तुम्ही कोणाच्या अपेक्षांच्या जाळ्यात अडकलेले आहात का? तुमचं मन मोकळं करून आयुष्याला हाय-हाय आणि नैराश्याला बाय-बाय करणारा धनंजय देशपांडे यांचा हा लेख नक्की वाचा .. )     के वळ हल्लीच्या लॉकडाऊनमुळेच नव्हे तर त्याच्या आधी सुद्धा आपल्यापैकी अनेकजण एका मोठ्या विकाराचे रुग्ण झालेलो आहोत. तो विकार (रोग) म्हणजे, "मी समोरच्याच्या मनासारखं कितीही चांगलं वागलो/वागले तरी उपयोग होत नाही. त्रासच होतो" खरेतर ही तक्रार घेऊन मला भेटायला येणाऱ्यांची संख्या कमी नाही. जमेल तसे त्यांना सांगतही असतो. तर या सर्वात मोठ्या प्रमाणावर (कोरोना पेक्षाही वेगाने) वाढणाऱ्या या रोगावर आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं. म्हणून हा लेखप्रपंच.      तर होत काय की, समोरची व्यक्ती आपल्यावर विनाकारण रागावली तर सहसा काय घडतं? आपणही एक तर त्याच्यावर चिडतो, क...

मी मोर्चा नेला नाही...

मी मोर्चा नेला नाही                    – संदिप खरे मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही                       – संदिप खरे