दृष्टांतः हत्तीचा
दृष्टांतः।
सर्वत्र म्हणतिले आनंद शक्ती परमेश्वर||: गावा हस्ति आला: ते जात्येंध्ये हस्तीपाहो गेले: एके पाओ देखीला : एके सोंड देखील: एके कांन देखीला: एके पाठ देखीला: एके पोट देखीले: एके पूंस देखीले मग एकमेका संवादति: अरे तुवा हस्ती देखीला : पावो देखीला तो म्हणे हस्ती खांबासारीखा: सोंड देखीली तो म्हणे हस्ती मुसळासारीखा: कान देखीला तो म्हणे हस्ती सुपासारीखा:: पाठ देखीली तो म्हणे हस्ती भींतीसारीखा: पोट देखीले तो म्हणे हस्ती कोथळेया सारीखा: ऐसें एकमेका उरोधीति: तयामध्ये डोळस असे तो म्हणे हा हस्तीचा एक अवयव होय: परि हस्ती नव्हे: ऐसा अवयवी युक्त तो हस्ती||
द्राष्टांन्तिक: तैसे जयासि जे शक्ती प्रकाशली असे तो तीए शक्तीते परमेश्वर म्हणजे: ज्ञानिया असे तो म्हणे हे ईश्वराची एक एक शक्ती होय. परी परमेश्वर नव्हे: ऐसा शक्तीयुक्त तो परमेश्वर||
#___________________________खलितसंकलन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा