नोम चॉमस्की (मराठी साहित्य संकलन) नोम चॉमस्की ७ डिसेंबर २०२० रोजी ९२ वर्षाचे झाले आणि त्यांनी ९३व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांना भाषाशास्त्रातील पुढील योगदानसाठी खूप खूप शुभेच्छा ! नोम चॉमस्की (७ डिसेंबर १९२८) यांनी आधुनिक भाषाशास्त्राला जन्माला घालून भाषेच्या गुंतागुंतीचा उकल करण्याची भूमिका घेतली. भाषेचा अभ्यास करताना तत्त्वज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि भोवतालचे राजकारण-समाजकारण, निसर्ग अशा अनेक गोष्टींचा संबंध त्यांनी भाषेच्या अभ्यासाला लावला. त्यांचा या क्षेत्रातला आवाका फार मोठा आहे. हे सारे करताना त्यांनी भाषेच्या पारंपरिक चौकटीला छेद दिला आहे. उजवा किंवा डावा कोणताही विचार असो, लोकांच्या जनचळवळींचा नेमक्या सामाजिक आणि राजकीय आशयावर, वर्मावर बोट ठेवून, ठाम भूमिका घेऊन त्यांनी भाषेचा अभ्यास मांडला आहे. भाषेच्या संदर्भात अकादमीय डिस्कोर्समध्ये भाषा ही संप्रेषणाचे प्रमुख साधन आहे, असे नेहमी म्हटले जाते (Language is a tool of communication ), हे खर...