र.वा.दिघे यांचं... प्रल्हाद शिंदेच्या आवाजातलं गीत यंदाच्या दुष्काळात राज्यभर गाजत आहे. हे गीत सुमारे 70 वर्ष जुनं आहे... यात सारं आलं....
पड रं पाण्या, पड रं पाण्या...
पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी...
शेत माझं लय तान्हलं चातकावाणी...
बघ नांगरल, कुळवून वज केलीss
सुगरणबाई पाभरीला शेतावर नेलीss
तापली धरणी,पोळली चरणी मी अनवाणीss
शेत माझं लय तान्हलं चातकावाणी...
निढळावर मी हात ठेवून, वाट किती पाहूss
खिंडी तोंडी हटवाद्या तू नको उभा राहूss
वरड वरडती राणी मोर मोर मोरणीss
शेत माझं लय तान्हेलं चातकावाणी...
पाण्या पड तू पाण्या मिरगा आधी रोहिनीचा
पाळणा रं लागे भावा आधी बहिनीचाss
पड रं पाण्या, पड रं पाण्या, भिजवी जमिनी
शेत माझं लय तान्हलं चाकतावाणी...
पड रं पाण्या शेत माझं अंगण सोन्याचंss
फुलत फुलत फुलतं त्याचं पिक मोत्याचंss
का रं तिळा तू झाला पिवळा शेवंतीवाणीsss
शेत माझं लय तान्हेलं चातकावाणी...
आला वळीव खिंडी तोंडी शिवार झोडीतss
जाईच्या रं झाडाखाली धनी पाभर सोडीतं
जेवण घेवून शेतावरती चालली कामिनीsss
शेत माझं लय तान्हलं चातकावाणी....
पड रं पाण्या, पड रं पाण्या,
कर पाणी पाणी......
कवी _ र. वा. दिघे
संकलन-Rodgesh@₹vlgaon.selu
छान
उत्तर द्याहटवा